निवृत्ती सोहळ्यास जमलेला समाज, हा समन्वयाने केलेल्या कामाची पोचपावती – महेंद्र क्षीरसागर शाखा अभियंता
बांबवडे : स्थापत्य अभियंता श्री धर्मा सीताराम कांबळे हे आपल्या कामात उत्कृष्ट होते, त्याचबरोबर ठेकेदार, सामाजिक काम यांचा समन्वय साधत त्यांनी आजवर स्वयंपूर्ण कामं केले आहे. आता निवृत्तीच्या उंबरठ्यावर त्यांना निश्चितच समाधान लाभत असेल. असे मत कोल्हापूर जिल्ह्याचे शाखा अभियंता महेंद्र क्षीरसागर म्हणजेच सर्वांचे आवडते व्यक्तिमत्व सागर रावसाहेब यांनी व्यक्त केले.


बांबवडे तालुका शाहुवाडी इथं धर्मा सीताराम कांबळे यांचा निवृत्ती सोहळा शाहुवाडी तालुका काँट्रॅक्टर वेल्फेअर असोसिएशन च्या वतीने घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाहुवाडी चे शाखा अभियंता के.ए.पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून महेंद्र क्षीरसागर यावेळी उपस्थित होते. यावेळी सागर रावसाहेब यांनी वरील उद्गार काढले.

ते पुढे म्हणाले कि, प्रत्येक अधिकाऱ्याने आपले काम आणि ठेकेदार यांच्याशी समन्वय राखत काम केल्यास, जनतेची कामे सुलभ होतील, आणि ठेकेदारांविषयी कोणाची तक्रार राहणार नाही. धर्मा कांबळे यांनी आपली कामाची भूमिका सांभाळत, कुटुंबाची भूमिका देखील उत्कृष्टरीत्त्या निभावली आहे. त्यांच्या या निवृत्ती सोहळ्यास जमलेला हा समाज हीच त्यांच्या कामाची पोचपावती आहे.

यावेळी शाखा अभियंता के.ए.पाटील यांनी धर्मा कांबळे यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दर्शविल्या.

यावेळी शाहुवाडी तालुका काँट्रॅक्टर वेल्फेअर असोसिएशन च्या वतीने श्री धर्मा कांबळे यांचा यथोचित सत्कार सन्मान चिन्ह शाल , कोल्हापुरी फेटा बांधून करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना श्री धर्मा कांबळे भावूक झाले. त्यांच्या डोळ्यातील समाधानाचे अश्रू त्यांच्या निकटवर्तीयांना दिसत होते, यावेळी श्री कांबळे म्हणाले कि, मी माझे काम इमानेइतबारे केले असल्यामुळे माझ्या या ठेकेदार बंधूंनी माझा सन्मान केला आहे. त्यांच्या या सन्मानाबद्दल मी त्यांच्या ऋणात राहणे पसंद करतो.

यावेळी त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, ठेकेदार, आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
यावेळी बांबवडे चे माजी सरपंच विष्णू यादव, सागर कांबळे, मुकुंद पवार, स्वप्नील लाड, आदी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केलीत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश डोंगरे यांनी केले,तर आभार विशाल यादव यांनी मानले.