पत्रकारांना नोटीसा काढल्याबद्दल पत्रकार संघाच्या वतीने निषेध
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील पत्रकारांनी विरोधात बातम्या लिहिल्यामुळे त्यांना तहसीलदार शाहुवाडी यांनी नोटीस काढल्या. हा पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर केलेला हल्ला असून, सदर घटनेचा शाहुवाडी तालुका पत्रकार संघ निषेध करीत आहे.
सदरबाबत शाहुवाडी इथं शाहुवाडी तालुका पत्रकार संघाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी पत्रकरांनी त्यांच्या विरोधात बातम्या लिहिल्या म्हणून अब्रुनुकसानीचा दावा लावण्या संदर्भात काही पत्रकरांना नोटीसा काढल्या. हा प्त्राकारांच्यावर झालेला अन्याय आहे. पत्रकार हा समाज माणसाचा आरसा असतो. ज्या बातम्या लिहिल्या त्या समाजाच्या दृष्टीने गरजेच्या होत्या. समाजाला त्या कळणे, गरजेच्या आहेत. अशावेळी तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी नोटीस काढणे चुकीचे आहे. दरम्यान सुरेश खोत याने तहसीलदार यांच्या नावाने पैसे मागितले. हे सुद्धा चुकीचे आहे. त्याच्याविरोधात तहसीलदार अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार का ? असा प्रश्न सुद्ध यावेळी उपस्थित करण्यात आला आहे.