माझी शाळा, सुंदर शाळा अभियान ” मध्ये शिराळे खुर्द शाळा प्रथम
शिराळा प्रतिनिधी :मुख्यमंत्री–माझी शाळा, सुंदर शाळा अभियान ” या महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये आपल्या जिल्हा परिषद शाळा शिराळे खुर्द शाळेने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
” माझी शाळा, सुंदर शाळा अभियान ” या ,,विद्यार्थीकेंद्रित उपक्रम प्रक्रिया,मध्ये विविध कामे केंद्रित केली आहेत. -शाळा सौंदर्यीकरण, शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी अवांतर उपक्रम, स्वच्छता , मॉनिटर, राष्ट्रीय एकात्मता प्रोत्साहन उपक्रम, विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा आणि कौशल्य विकासबाबत उपक्रम अशा एकूण २९ घटकात उत्कृष्टपणे उपक्रम राबवून “तालुक्यात प्रथम क्रमांक” प्राप्त करून 3 लाख रुपयाचे बक्षीस मिळवले.. सदर शाळेची वाळवा पंचायत समिती पथकाकडून तपासणी करण्यात आली होती,,,आपल्या शिराळे खुर्द शाळेची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन.*
*सदर शाळा व्दिशिक्षकी शाळा असून सदर शाळेने चालू शैक्षणिक वर्षात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत,तसेच शाळेने विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व स्पर्धेत तसेच क्रीडा स्पर्धेत हे उल्लेखनीय सुयश मिळवले आहे,, लोकसहभागातून शाळेचे बाह्यांग आकर्षक केलेले आहे. शाळेने राबवलेला डिजीटल डिटाॅक्स अर्थात शिक्षणाचा भोंगा उपक्रमाचे महाराष्ट्रभर कौतुक झालेले आहे. शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश सावंत, सहकारी शिक्षक सतिश मोरे आणि शाळा व्यवस्थापन समिती,आजी माजी सैनिक, नोकरदार वर्ग, पालक आणि ग्रामस्थ यांचे योगदान महत्त्वाचे आहे.
सदर शाळेस शिराळा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी पोपटराव मलगुंडे, विस्तार अधिकारी बाजीराव देशमुख, धोंडीराम गोसावी, जगन्नाथ पाटील, बाबासो कांबळे, केंद्रप्रमुख दिलीपकुमार मोरे, दादासो खोत सुहास रोकडे तानाजी माने हरीभाऊ घोडे रमण खबाले, श्रीरंग किनरे तानाजी जाधव, प्रताप कांबळे आलिशा मुलाणी तसेच बिआरसी टीमचे मार्गदर्शन मिळाले.