लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यालय मध्ये समर कँप संपन्न
शिराळा प्रतिनिधी : चिखली तालुका शिराळा येथील लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यालय चिखली येथे सोमवार दिनांक 17 एप्रिल 2023 ते 21एप्रिल 2023 रोजी समर कँप संपन्न झाला.


हा कॅम्प संग्राम पाटिल सर यांनी आयोजित केला होता. या कॅम्प साठी मलकापुर येथील ब्लॅक बेल्ट कराटे चँपियन अल्फिया अत्तार यांचे मार्गदर्शन लाभले.

त्यानी 5 दिवसांच्या कॅम्प मध्ये मुलांना कराटे व लाठी / काठी चे प्रशिक्षण दिले.अशा कॅम्प साठी सर्व पालकांच्यातून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. दिनांक 21एप्रिल रोजी सदर कॅम्प चा समारोप झाला . समारोप कार्यक्रमास संस्था अध्यक्ष अमरसिंह पापा यांनी उपस्थित राहुन, मुलांचे कौतुक केले. पालक प्रतिनिधी मोहन यादव आप्पा यांचे हस्ते अत्तार मॅडम यांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी शाळेचे मुख्याध्यापक डी.पी.गवळी सर व शिक्षक, शिक्षकेत्तर स्टाफ उपस्थित होते