शाहुवाडीत एमआय डी सी साठी प्रयत्न करणार – श्री विजयसिंह देसाई ( बाळासाहेबांची शिवसेना )
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील पत्रकारांचा, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने पत्रकार दिनाचे औचित्य साधून शिल्ड देवून सन्मान केला. यावेळी सह्भोजानाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते.
यावेळी येळाणे ग्रामपंचायत च्या नूतन सदस्यांनी श्री विजयसिंह देसाई यांचा सत्कार केला.

शाहुवाडी तालुक्यातील सरूड येथील विजयसिंह देसाई सरकार यांची बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या तालुकाप्रमुख पदी पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देवून सन्मान करण्यात आला होता. त्याच अनुषंगाने श्री देसाई यांनी तालुक्यात कामाला सुरुवात देखील केली आहे.

नियुक्ती च्या सुरुवातीला या पक्षाने तालुक्यात दहा शाखांचे उद्घाटन झाले. यावेळी तालुक्यातील नवीन पिढी देसाई यांनी एकत्र केली असून, नवे आणि जुने यांचा दुग्धशर्करा योग साधला आहे.

यावेळी पत्रकारांनी आपली मनोगते व्यक्त करताना शाहुवाडी तालुक्याला औद्योगिक दृष्ट्या सक्षम करा. बेरोजगारांच्या हातांना काम द्या, असे आवाहन केले.

यावेळी मुकुंद पवार म्हणाले कि, शाहुवाडी तालुक्याच्या प्रगतीसाठी विद्यमान खासदारांनी आपल्या फंडातून विकासकामे करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्याबाबत काहीच झाले नाही. परंतु बाळासाहेबांची शिवसेना यांच्या माध्यमातून तरी तालुक्याला उभारी मिळावी, अशी अपेक्षा मुकुंद पवार यांनी व्यक्त केली.

यावेळी पत्रकारांशी बोलताना, विजयसिंह देसाई म्हणाले कि, शाहुवाडी तालुक्यात एम.आय.डी.सी. आणण्याचा पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या माध्यमातून यशस्वी प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर जुने पोलीस ठाणे इथं अॅग्रो मार्ट निर्माण करणार असून, एकाच छताखाली सर्व भाजीपाला मिळेल, हा यामागे हेतू आहे. याचबरोबर तालुक्यातील पर्यटनाला प्रोत्साहन मिळण्यासाठी आंबा इथं पर्यटन विकासाच्या अनुषंगाने निधी उपलब्ध करून देणार आहे.

त्याबरोबर लोककलाकारांचा पर्यटन महोत्सव भरवून आजच्या पिढीला माहित नसलेली लोककलाकारांची परंपरा सादर करणार आहोत. तसेच ज्या लोककलाकारांना मानधन मिळत नाही, त्यांना मानधन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. असे अनेक मनसुबे तालुकाप्रमुख विजसिंह देसाई सरकार यांनी बोलून दाखवले.

यावेळी पत्रकार आनंदराव केसरे, अमर पाटील, डी. आर. पाटील,यांनी मनोगते व्यक्त केलीत.

यावेळी सुरभी सामाजिक संस्थेचे श्री गिरी सर, खडके गुरुजी, आनंदराव भोसले करंजोशी, तसेच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संतोष कुंभार, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मिडिया प्रमुख राजाराम कांबळे यांनी केले.