राजकीयसामाजिक

शाहुवाडी तालुक्यात श्री माने  प्रचारात आघाडीवर

बांबवडे : हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार श्री धैर्यशील माने यांच्या प्रचाराने शाहुवाडी तालुक्यात आघाडी घेतली आहे. यासाठी विद्यमान आमदार डॉ. विनय कोरे यांचे खंदे समर्थक श्री सर्जेराव पाटील पेरीडकर दादा यांनी मलकापूर परिसरातील वाडी-वस्तीला भेट देवून श्री माने यांच्या विजयासाठी आवाहन केले आहे. या आघाडीत भाजप चे तालुकाध्यक्ष पांडुरंग वग्रे आबा यांनी देखील आपली जुनी कार्यकर्त्यांची फळी कामाला लावल्याचे दिसून येत आहे. ग्रामस्थ सुद्धा त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आहेत.


दरम्यान गोकुळ चे संचालक कर्णसिंह गायकवाड यांनी सुद्धा विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्या विजयासाठी आपले सर्व कार्यकर्ते एकत्र करून त्यांना मतदान करण्याचे आवाहन करताना दिसत आहेत.


बांबवडे, खुटाळवाडी, सुपात्रे पंचक्रोशीत धैर्यशील माने यांच्या बाजूने लोकमत वाढताना दिसत आहे. हे जरी खरे असले तरी इतर दोन तुल्यबळ उमेदवार रेस मध्ये आहेत. हि गोष्ट विसरून चालणार नाही. तरीही सद्यस्थितीत माजी खासदार राजू शेट्टी हे सुद्धा प्रचारात आघाडी घेताना दिसत आहेत.
दरम्यान सर्जेराव पाटील पेरीडकर दादा आणि कर्णसिंह गायकवाड हे दोन खंदे समर्थक शाहुवाडी तालुक्याची धुरा यशस्वीपणे सांभाळताना दिसत आहेत.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!