शाहुवाडी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी केसरे तर कार्याध्यक्ष पदी मुकुंद पवार यांची निवड
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील शाहुवाडी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी दै. पुढारीचे आनंदराव केसरे,तर कार्याध्यक्ष पदी साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स चे संपादक मुकुंद पवार यांची निवड करण्यात आली आहे. तसेच दै. लोकमत चे राजाराम कांबळे यांची संघाच्या उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. सर्वच नूतन पदाधिकाऱ्यांचे साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने हार्दिक अभिनंदन.
शाहुवाडी तालुका पत्रकार संघाची नवी कार्यकारिणी ची नवड नुकतीच संपन्न झाली. यावेळी अध्यक्ष पदी माजी अध्यक्ष संतोष कुंभार होते.
यावेळी सुभाष बोरगे यांनी पत्रकार संघातील सर्वच सदस्यांनी एकजूटी ने राहावे, असे सूचित केले. त्यावेळी पत्रकार संघाच्या सर्वच सदस्यांनी यावेळी एकजूटी ने राहण्याची प्रतिज्ञा घेतली.
यावेळी आनंदराव केसरे, मुकुंद पवार आदींनी मनोगते व्यक्त केलीत.
या पत्रकार संघाच्या बैठकीला शामराव पाटील, नथुराम डवरी,श्रीमंत लष्कर, डी.आर. पाटील, रमेश डोंगरे, दशरथ खुटाळे, चंद्रकांत शेळके, संजय पोवार, रोहित पास्ते, आदी सदस्य उपस्थित होते. यावेळी नूतन उपाध्यक्ष राजाराम कांबळे यांनी आभार मानले.