सरूड च्या कडवी पुलाजवळ झालेल्या दुचाकी व चार चाकी वाहनांच्या अपघातात एक ठार, तर एक जखमी
बांबवडे प्रतिनिधी : सरूड तालुका शाहुवाडी येथील कडवी नदीच्या पुलाजवळ एका ओमनी कार ( क्र.एम.एच.-०९- बीबी- १८१७ ) ला ओव्हरटेक करताना, दुचाकी चालक ( दुचाकी क्र.एम.एच.-४३ ए ए -८६७ ) जागीच ठार झाला, तर एक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर बांबवडे इथं खाजगी दवाखान्यात उपचार सुरु आहे. अशी माहिती घटना स्थळावरून मिळालेली आहे.

सरूड येथील कडवी नदीच्या पुलाजवळ एक ओमनी कार बांबवडे दिशेला येत होती. यावेळी मागून भरधाव वेगाने विघ्नेश आनंदा पाटील (वय १७ वर्षे )हा तरुण, कार ला ओव्हरटेक करीत असताना, त्याचे दुचाकी वरचे नियंत्रण सुटले, व तो ओमनी कार वर आदळल्याने अपघात झाला. हा अपघात एवढा मोठा होता कि, विघ्नेश जागीच ठार झाला. तर त्याच्यासोबत असलेला तरुण गंभीर जखमी झाला आहे. विघ्नेश पाटील याचे शव, शवविच्छेदन प्रक्रियेसाठी मलकापूर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते.

विघ्नेश पाटील याचे मूळ गाव पिशवी तालुका शाहुवाडी असे आहे. विघ्नेश हा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या आई-वडिलांचे बांबवडे इथं हॉटेल आहे. त्याच्या या निधनाने पिशवी गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे.