सुपात्रे ग्रामपंचायत वर संयुक्त गायकवाड गटाचे जय हनुमान ग्रामविकास पॅनेल चे वर्चस्व ग्रामपंचायत वर संयुक्त गायकवाड गटाचे जय हनुमान ग्रामविकास पॅनेल चे वर्चस्व
बांबवडे : सुपात्रे तालुका शाहुवाडी इथं संयुक्त गायकवाड गटाच्या जय हनुमान ग्रामविकास पॅनेल ने या ग्रामपंचायत निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. केवळ एका जागेवर त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे.
या निवडणुकीत कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक रणवीरसिंग गायकवाड तसेच मानसिंगराव गायकवाड, कर्णसिंह गायकवाड यांनी लक्ष घातले होते. या पॅनेल चे नेतृत्व श्री संदीप पाटील सुपात्रेकर यांनी केले होते. लोकनियुक्त सरपंच म्हणून सौ दीपांजली संदीप पाटील या २७४ मतांची आघाडी घेवून विजयी झाल्या आहेत.
दरम्यान या निवडणुकीत नोटा साठी सुमारे १८२ मते मिळाल्याने हा विषय सुद्धा चर्चेचा झाला आह
फक्त एका जागेवर विरोधकांना समाधान मानावे लागले आहे. एकंदरीत पुन्हा एकदा गायकवाड गटाने आपले वर्चस्व प्रस्थापित केले.