राजकीयसामाजिक

…अरे, पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली – संपर्कप्रमुख आनंदराव भेडसे


बांबवडे प्रतिनिधी : स्व. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना हायजॅक करणाऱ्या लोकांना त्यांची जागा दाखवण्यासाठी, प्रत्येक शिवसैनिकाने आपल्या आयुष्याच्या मशाली पेटवून शिवसेनेच्या अंधाराची, नवी पहाट निर्माण करावी, असे आवाहन शिवसेनेचे शाहुवाडी तालुका संपर्क प्रमुख आनंदराव भेडसे यांनी केले आहे.

माऊली खुटाळे बांबवडे


मुंबई येथील मुळचे शिवसैनिक असलेले व शाहुवाडी तालुक्याचे संपर्कप्रमुख असलेले आनंदराव भेडसे यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना मत प्रतिपादन केले.


ते पुढे म्हणाले कि, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना अडचणीत आणून, त्यांच्याकडून शिवसेना ओरबाडून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधी मंडळी करीत आहेत. परंतु सामान्य शिवसैनिक मात्र उद्धवसाहेब यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. कितीही लोकप्रतिनिधी फुटले, तरी शिवसैनिक मात्र आपली जागा सोडत नाही. हीच शिवसेनेची निष्ठा आहे.


आपल्या शाहुवाडी तालुक्यातील शेंबवणे येथील असलेले दिवंगत रमेश लटके, यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी ऋतुजा रमेश लटके यांना शिवसेने तर्फे उमेदवारी जाहीर करण्यात आली असून, त्यांना निवडून आणण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने पुन्हा एकदा आपल्या आयुष्याच्या मशाली पेटवण्याची गरज असून, शिवसैनिक त्यात कमी पडणार नाही असेही श्री आनंदराव भेडसे यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!