अवघी जमली चाहत्यांची मांदियाळी
बांबवडे : स्व.आमदार संजयसिंह गायकवाड दादा यांच्या स्मृतिदिनानिमित्त सुपात्रे येथील त्यांच्या घरी विधिवत पूजन करण्यात आले, तर समाधीस्थळावर देखील पूजन करण्यात आले. तसेच स्व. संजयदादांच्या पत्नी माजी आमदार संजीवानिदेवी गायकवाड त्यांचे सुपुत्र व गोकुळ चे संचालक कर्णसिंह गायकवाड, इंद्रजीतसिंह , व माजी जि.प. सदस्य योगीराजसिंह गायकवाड आणि त्यांचे कुटुंबीय या सर्वांनी समाधी स्थळाचे पूजन करून दर्शन घेतले.


यावेळी पंढरीच्या विठोबाला जशी वारकऱ्यांची मांदियाळी जमते. अगदी तशीच मांदियाळी दादांच्या या स्मृतिदिनानिमित्त जमली होती.
दादांच्या या स्मृतिदिनानिमित्त शाहुवाडी, पन्हाळा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील जनता या दिवशी दादांना वंदन करण्यास उपस्थित होती. यावेळी मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉ. विनय कोरे यांनी उपस्थिती दर्शविली आणि समाधी स्थळाचे दर्शन घेतले.या जनतेमध्ये अनेक आजी माजी पदाधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी यांच्यासहित दादांची खुळी कावरी जनता फार मोठ्या संख्येवर उपस्थित होती.

यामध्ये प्रामुख्याने कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक रणवीरसिंग गायकवाड, माजी शाहुवाडी पंचायत समिती चे सभापती सौ भाग्यश्रीदेवी गायकवाड, सर्वश्री सुभाषराव इनामदार, पंडितराव नलवडे, महादेव पाटील, विष्णू पाटील, अमरसिंह खोत शाहुवाडी पंचायत समिती सदस्य , अरुण अथणे काका ( दादांचे निकटचे मित्रवर्य ), भरतराज भोसले , विष्णू यादव, आनंदा तोरस्कर, नामदेव पाटील, बाबुराव शेळके, धोंडीराम शिंदे, दिग्विजय डवंग , बांबवडे चे सरपंच सागर कांबळे, उपसरपंच सयाजी निकम, शामराव कांबळे, कांग्रेस च्या महिला आघाडी च्या नेत्या सौ वैशाली बोरगे, के.एन. लाड, स्वप्नील लाड, शिवाजी सांगळे, पृथ्वीराज सरनोबत, पांडुरंग काशीद, पिंपळे तर्फ ठाणे चे कृष्णात शिंदे, विद्यानंद यादव, विजय पाटील थेरगाव, संदीप केमाडे, उत्तम पाटील सुपात्रेकर, धनराज लाड, न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक वास्कर सर ,गवळी सर, खुटाळे सर, आणि शिक्षक वृंद, बांबवडे -डोणोली येथील संजयसिंह गायकवाड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य जाधव सर, अक्षय शेळके सर, चरण चे डॉ.महेकर, खुटाळवाडी येथील पत्रकार दशरथ खुटाळे, रमेश डोंगरे, आर. डी. पाटील, थेरगाव चे अखिल भारतीय मराठा महासंघ चे सुनील पाटील, अमर पाटील, इंद्रजीत इनामदार, परखंदळे चे शिवाजीराव कोल्हापुरे, लक्ष्मण पाटील सुपात्रे, सुहास कोल्हापुरे, धनराज लाड, रघुनाथ लाड, दत्तात्रय यादव, माणिक ढेरे, विजय ढेरे, युवराज चावरे,यांच्यासहित असंख्य संजयदादा चाहत्यांची पंढरी कार्यक्रमस्थळी आपल्या नेत्यांना आदरांजली वाहण्यास गोळा झाली होती. जागेअभावी सर्वांचीच नावे तक्ता येत नाहीत.