आम्ही शाहुवाडीकर, शिवसैनिक, उद्धव साहेबांसोबत ठाम राहणार – माजी आमदार सत्यजित पाटील
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील शिवसेना, हि नेहमीच उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिली आहे. आणि या पुढेही ती राहणार आहे. मधूनच सोबत आलेले असे, कितीही परत गेले, तरी आम्ही मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम राहणार असल्याचे प्रतिपादन, शाहुवाडी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.

दरम्यान हातकनंगले लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी बंडखोरी करत, शिंदे गटात सामील झाले. या अनुषंगाने एसपीएस न्यूज ने विचारल्यानंतर माजी आमदार सत्यजित पाटील यांच्याशी बातचीत करताना, त्यांनी आपले मत मांडले.

यावेळी आम. सत्यजित पाटील पुढे म्हणाले कि, कोणी कुठेही जावो, आम्ही शाहुवाडीकर ठामपणे उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहोत. असे सांगताना ते म्हणाले कि, बाहेरून आलेल्या मंडळींबाबत आम्ही काय बोलणार, पण जी मंडळी बाहेरून आली, पक्षाने त्यांना आपलंसं केलं, पण आपला स्वार्थ साधल्यानंतर मात्र हि मंडळी निघून गेलीत. असो. आम्ही मात्र शिवसेनेशी बांधील आहोत, उद्धवसाहेब यांच्यासोबत कायम राहणार, असेही माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांनी ठामपणे सांगितले.