आशिष पाटील यांच्यावर जेसीबी तून अभिनंदनाची पुष्पवृष्टी – श्री विजयराव बोरगे
बांबवडे : साळशी तालुका शाहुवाडी येथील आशिष अशोकराव पाटील हे महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत ५६३ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. या अनुषंगाने त्यांची बांबवडे येथून ओपन जीप मधून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जि.प.सदस्य विजयराव बोरगे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आशिष पाटील यांच्यावर जेसीबी तून पुष्पवृष्टी केली. हि अभिनंदनाची नवी पद्धत पाहून, सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. आणि आनंद देखील झाला.

दरम्यान या मिरवणुकीत श्री विजयराव बोरगे यांनी त्यांच्या कार्यालयाजवळ आशिष पाटील यांना शाल श्रीफळ देवून, त्यांचे अभिनंदन केले. दरम्यान श्री बोरगे हे देखील मौ. साळशी गावचे रहिवाशी असल्याने, त्यांना आपल्या गावातील या युवकाचा अभिमान आहे. असे मत श्री विजयराव बोरगे यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.

यावेळी विक्रम पाटील, रवींद्र पाटील, पिंटू लव्हटे, राहुल बंडगर, पोपट सुतार, हर्षवर्धन पाटील, गणेश सुतार, कु. पृथ्वीराज बोरगे, कु. साईवर्धन पाटील, अमर सुतार, चंद्रकांत सुतार, धनाजी मेटील, नितीन मगदूम व मान्यवर यावेळी उपस्थित होते.