नैसर्गिक साधन संपत्ती हे उपजीविकेचे साधन होईल-खासदार धैर्यशील माने
मलकापूर प्रतिनिधी ( रोहित पास्ते ) :कडवी नदी संर्वधनाचा प्रकल्प पूर नियंत्रणासह जल संवर्धन आणि येथील पर्यटन उद्योगाला चालना देणारा ठरेल असा विश्वास खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केला.कडवी नदी जलस्त्रोत लोकार्पण सोहळ्यात ते मार्गदर्शन करीत होते.

अध्यक्षस्थानी माजी आमदार सत्यजित पाटील होते. यावेळी कडवी नदी पात्रात पणत्या प्रवाहीत करून नदीची समृद्धी जपण्याचा निर्धार करण्यात आला.

खासदार माने पूढे म्हणाले, येथील नैसर्गिक साधनसंपत्ती स्थानिकांच्या उपजिविकेचे साधन कसे बनेल, असा पर्यावरण पूरक पर्यटन विकासाचा मास्टर प्लॅन बनवला आहे. हातकणंगले लोकसभा मतदार संघातील प्रेक्षणीय स्थळांचा विकास साधण्यास पर्यटनमंत्री आदीत्य ठाकरे यांच्याकडून खास बाब म्हणून निधी उपलब्ध करीत असल्याची ग्वाही श्री माने यांनी दिली.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखांवार म्हणाले, पूराची कारणे आणि नदी प्रदूषण याबाबत प्रत्येक घटकात जागृती करून जल आणि मृदू जपणारे सामाजिक भान उभे करावे. नदी जिवनवाहीनी आहे. वाडवडीलांचा हा ठेवा, तिचे पवित्र जपावे लागेल. ” जल है तो कल है ” हा विचार रूजवून येथे मुबलक पडणाऱ्या पाऊसाचे पाणी व जलस्त्रोतांचे रक्षण करणारी, ते प्रदूषण मुक्त ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाने उचलावी लागेल.

यावेळी मोहीमेतील बारा गावच्या जलदूतांचा सन्मान करण्यात आला. यावेळी नदी संवर्धनाचा माहीतीपट अजिंक्य बेर्डे यांनी सादर केला.

प्रास्ताविक विजय देसाई (सरकार) यांनी केले. राजेंद्र लाड यांनी पूर नियंत्रण प्रकल्पाची माहिती दिली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, उपाध्यक्ष नामदेव गिरी, अमरसिंह पाटील, किरण पडवळ, तहसीलदार गुरू बिराजदार, एम.ए.मेटकरी, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ए.एस.किटवाडकर, सहाय्यक गटविकास अधिकारी संदिप कोटकर, बापू वायकूळ, माजी उपसभापती बाळासाहेब गद्रे, सरपंच समता वायकूळ (आंबा) , नंदीनी पाटील (केर्ले), वंदना पाटील (वालूर), विश्वजीत देसाई, संदिप पाटील, गणेश पाटील, संभाजी देसाई, शंकर पाटील, सिताराम पाटील, प्रमुख उपस्थित होते..यावेळी शाहूवाडीत विधवा बंदीचे पहिले पाऊल आंबा ग्रामपंचायतीने उचलले, त्याबद्दल सरपंच समता वायकुळ व पतंजली तहसिल पूजा धावडे यांचेसह अपघातग्रस्त मदत पथक व शैक्षणिक व्यसपिठातील तरूणांचा खासदार म्हणून माने यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन संतोष कुंभार यांनी केले.आभार संभाजी लोहार यांनी मानले.

कडवी खोऱ्यातील शेतकरी अल्पभूधारक आहे.अतिवृष्टि,जंगली प्राण्यामुळे शेती तोट्यात आहे.पण शेतीपूरक व्यवसायातून पर्यटन वाढवून रोजगारांच्या संधी उपलब्ध करता येतील.खासदार माने यांच्या संकल्पनेतून बर्कीपासून ते पावनखिंड आंबा हा जैवविविधतेचा कोरीडोअर पर्यटनाने संपन्न करू अशी ग्वाही माजी आमदार सत्यजित पाटील यांनी दिली.

जिल्हाधिकारी राहुल रेखांवार म्हणाले,लोकसहभाग व शासकीय निधीतून नदी संर्वधनाची मोहीम राबवली. यापूढे ती कायमस्वरूपी स्वच्छ व प्रदूषण मुक्त राहील यासाठी सजग रहावे. लोकचळवळीतून उभी राहीलेली ही जिल्ह्यातील पहिलीच यशस्वी मोहीम असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.