शिवाऱ्यात ४२६ मतांनी बाटली आडवी :जनसेवा प्रतिष्ठानचे यश
बांबवडे (प्रतिनिधी) : शिवारे तालुका शाहुवाडी इथं शिवारे विद्यामंदिरात दारूबंदीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. दारूबंदी साठी उत्स्फूर्त मतदान होवून ४२६ मतांनी दारूची बाटली आडवी झाली.
दारूबंदीसाठी शिवाऱ्यात झालेल्या मतदान प्रक्रियेत एकूण ६०० मतदानापैकी ४६७ मतदान झाले. पैकी आडव्या बाटली साठी ४२६ तर उभ्या बाटली साठी ३१ व १० मतदान अवैध झाले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नायब तहसीलदार राजेंद्र पाटील यांनी काम पहिले. केंद्रप्रमुख म्हणून मंडल अधिकारी अंकुश रानमळे हे काम पाहत होते. मतदान प्रक्रियेसाठी इतर ए.बी.पाटील, नसीम मुलाणी, रोहिणी पाटील,एम.एम.जाधव,पोलीस हवालदार सर्जेराव पाटील व इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान या दारूबंदी विरोधात प्रचार करण्यासाठी जनसेवा युवा प्रतिष्ठानने विडा उचलला होता. यात मुलींनी देखील आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. यासाठी दारूबंदीचे राज्य निमंत्रक गिरीश फोंडे,पन्हाळा तालुक्यातील काळ्जवडे येथील श्रद्धा पाटील, तर गावातील अर्चना पाटील, प्रियांका चौगुले,पल्लवी चौगुले,अपर्णा पाटील,विखा पवार,संग्राम पाटील, सुरेश कोकाटे ,जालिंदर पोवार, गावातील महिला व ग्रामस्थांनी या दारूबंदीसाठी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला .