बांबवडेतील विघ्नहर्ता मंडळाने जपली सामाजिक बांधिलकी
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील विघ्नहर्ता मित्र मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत कोणतीही गर्दी होवू नये, यासाठी सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.
प्रती वर्षी होणारा पानसुपारी चा कार्यक्रम मंडळाच्या वतीने रद्द करण्यात आला आहे. या कार्यक्रमाद्वारे हे मंडळ गावातील सर्व तरुण मंडळांना पानसुपारी आणि श्रीफळ देवून एकोप्याचा संदेश समाजाला देत आले आहे. परंतु यंदा कोरोना चे अतिक्रमण सर्वच क्षेत्रावर झाले आहे. आपल्या या कार्यक्रमामुळे गर्दी होवू नये,आणि सामाजिक बांधिलकी जोपासावी,या अर्थाने हा कार्यक्रम रद्द केला आहे.
या मंडळाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सर्व निकम बंधू आहेत. राजेंद्र निकम, गणेश निकम आणि सर्व निकम परिवाराच्या वतीने गणेशोत्सवाच्या सर्व गावाला शुभेच्छा दिल्या आहेत.