ग्रामस्थांना चोवीस तास आरोग्य सुविधा मिळाली पाहिजे : बांधकाम व आरोग्य सभापती सर्जेराव पाटील पेरीडकर
सोंडोली (प्रतिनिधी ) :
डोंगर कपारीत राहणाऱ्या ग्रामीण जनतेला चोवीस तास वैद्यकीय सेवा मिळाली पाहिजे, या कामाबाबतचे अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. असे मत जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती श्री सर्जेराव पाटील पेरीडकर यांनी व्यक्त केले.
शित्तूर-वारुण तालुका शाहुवाडी इथं प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने वतीने भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी श्री पाटील पुढे म्हणाले कि,शित्तूर-वारुण प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत परिसरात पंचवीस गावे व वाड्या-वस्त्या येत आहेत.येथील रुग्णांना वेळेत वैद्यकीय सेवा मिळाली पाहिजे,यासाठी कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी मिळण्यासाठी विशेष प्रयत्न करीत आहोत.येथील रुग्णांना चोवीस तास सेवा मिळणे गरजेचे आहे.शाहुवाडी पंचायत समितीचे नूतन सदस्य विजयराव खोत यांच्यासहित सभापती सर्जेराव पाटील पेरीडकर यांच्यासहित मान्यवरांचा सत्कार आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी माजी उपसभापती बबनराव पाटील, संरपच तानाजी भोसले, बाळासो कांबळे , आण्णासो पाटील , सोंडोली ,.वैद्यकीय अधिकारी डाँ . पटेल, डाँ . शिंदे , पी.ए.दिक्षित, सी.व्ही.खाडे, व प्रथमिक आरोग्य केद्रांचे कर्मचारी उपस्थित होते