बांबवडे सरपंचांचा वाढदिवस धार्मिक वातावरणात संपन्न
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील लोकनियुक्त व लोकप्रिय सरपंच सन्मानीय श्री भगतसिंग चौगुले यांचा वाढदिवस संपन्न झाला. त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स , एसपीएस न्यूज व दैनिक किल्ला या वृत्तपत्र समूहाच्या वतीने उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.
श्री भगतसिंग चौगुले हे तरुण व्यक्तिमत्व गावाला लाभले,आणि त्यांनी अवघी तरुणाई एकत्र केली. त्यांनी आपल्या सर्व उपसरपंच सदस्य मंडळाला एकत्र घेवून गावात सुमारे साडे तीन कोटींची विकासकामे कार्यान्वित केली.
या सर्व कार्कीर्दीमागे अनेक तरुण तसेच आबालवृद्ध ग्रामस्थांचा आशीर्वाद आहे. या सर्व कार्यात त्यांना उपसरपंच सुरेश नारकर, स्वप्नील घोडे-पाटील तसेच ग्रामविकास आघाडी प्रमुख श्री अभयसिंह चौगुले यांचे सहकार्य लाभले आहे. पुनश्च सरपंच भगतसिंग चौगुले यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा.