भटक्या कुत्रीचा बांबवडे मध्ये उच्छाद :लहान मुली, गर्भवती महिला जखमी : शासकीय यंत्रणाचे दुर्लक्ष
बाबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील गणेशनगर मध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने अनेक नागरिकांना चावून गंभीर जखमी केले आहे. याबाबत पोलीस ठाणे आणि वन विभागाला कळवूनही कोणीही याबाबत दखल घेत नसल्याचे समजते.
बांबवडे येथील गणेशनगर मध्ये काल दि.२७ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारपासून या पिसाळलेल्या कुत्रीने उच्छाद मांडला अआहे. यामध्ये दोन लहान मुलींना एका गर्भवती महिलेला सुद्धा चावली असून, रात्री च्या दरम्यान संपूर्ण गणेशनगर मधील नागरिक कुत्र्याचा बंदोबस्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. परंतु शासकीय विभाग या घटनेकडे अजिबात लक्ष देत नाही. याचे फार मोठे आश्चर्य वाटत आहे. काल थेरगाव इथ बिबट्या प्रकरणासाठी वनविभागाचे कर्मचारी उपस्थित असतानाही त्यांनी या घटनेकडे दुर्लक्ष केले आहे.
याबाबत श्साकीय विभागाने त्वरित लक्ष घालावे, अन्यथा नागरीकांना रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा येथी ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य श्री सुरेश नारकर यांनी दिला आहे.