‘प्रतिभा दुध’ च्या टेम्पो तील दुध स्वाभिमानी च्या कार्यकर्त्यांनी उलटले : शांततेतील ‘महाराष्ट्र बंद ‘ ला गालबोट
बांबवडे : शांततेत सुरु असलेल्या महाराष्ट्र बंदला बांबवडे त डाग लागला. बंद च्या काळात प्रतिभा दुध चा टेम्पो आज बंद च्या दिवशी प्रतिभा दुध चा टेम्पो दुध संकलन करून निघाला. त्यावेळी बांबवडे इथं स्वभिमानीच्या कार्यकर्त्यांनी टेम्पो अडवून दुध उलथून टाकले. शानातेत सुरु असलेल्या बंद ला गालबोट लागले.
आज दिवसभर स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बांबवडे व्यापार पेठेला बंद चे आवाहन केले. तसेच व्यापाऱ्यांनी देखील शेतकऱ्यांना व्यापार बंद ठेवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. परंतु सायंकाळी प्रतिभा दुध चा टेम्पो दुध संकलन करून जात असल्याची बातमी स्वाभिमानी च्या कार्यकर्त्यांना लागली आणि ,कार्यकर्त्यांनी दुध टेम्पो अडवला,व त्यातील दुध उलथून टाकले. या आंदोलनात सुरेश म्हौटकर , तालुकाध्यक्ष जयसिंग पाटील, युवा अध्यक्ष पद्मसिंह पाटील,उपाध्यक्ष अमर पाटील, युवा उपाध्यक्ष गुरुनाथ शिंदे, उत्तम पाटील आदि कार्यकर्ते उपस्थित होते.