मलकापूर नगरपरिषद आरक्षण जाहीर : राजकीय घडामोडींना वेग
मलकापूर प्रतिनिधी : शाहुवाडी तालुक्यातील मलकापूर नगर परिषद मध्ये आरक्षण सोडत संपन्न झाली. या नगरपरिषद मध्ये एकूण २० प्रभाग झाले आहेत.

मलकापूर नगरपरिषद आरक्षण पुढील प्रमाणे :
१. अ. अनुसूचित जाती प्रवर्ग, १. ब. सर्व साधारण महिला प्रवर्ग, २. अ. नागरिकांचा मागास महिला प्रवर्ग, २. ब. सर्व साधारण प्रवर्ग, ३. अ. नागरिकांचा मागास महिला प्रवर्ग, ३.ब. सर्व साधारण प्रवर्ग, ४. अ. नागरिकांचा मागास प्रवर्ग, ४.ब. सर्व साधारण महिला प्रवर्ग, ५.अ. अनुसूचित जाती महिला प्रवर्ग, ५.ब. सर्व साधारण प्रवर्ग, ६.अ. अनुसूचित जाती महिला प्रवर्ग, ६.ब. सर्व साधारण प्रवर्ग, ७. अ. अनुसूचित जाती प्रवर्ग, ७.ब. सर्व साधारण महिला प्रवर्ग, ८. अ. सर्व साधारण महिला प्रवर्ग, ८.ब. सर्व साधारण प्रवर्ग, ९.अ. नागरिकांचा मागास प्रवर्ग, ९. ब. सर्व साधारण महिला प्रवर्ग,
१०. अ. नागरिकांचा मागास महिला प्रवर्ग, १०. ब. सर्व साधारण प्रवर्ग.

यावेळी जिल्हा पुनर्वसन अधिकारी कोल्हापूर अश्विनी जिरंगे, मलकापूर नगरपरिषद मुख्याधिकारी विद्या कदम, प्रसाद हर्डीकर, महेश गवखंडकर, विनोद तवर, ऋषिकेश पाटणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या आरक्षण सोडत मुळे मलकापूर नगरी मध्ये राजकीय वातावरणास जोर चढू लागला आहे.