महाराष्ट्राच्या राजधानीत मराठ्यांची त्सुनामी
मुंबई : महाराष्ट्राच्या राजधानीत मराठ्यांची त्सुनामी दाखल झाली आहे. मराठा बांधवांच्या उद्रेकाचा हा नमुना आहे. या मोर्चामुळे मुंबईत वाहतुकीची कोंडी होत आहे. हा मूक मोर्चा अभूतपूर्व ठरेल,असेच एकंदरीत परिस्थितीवरून लक्षात येत आहे.
हा मोर्चा जिजामाता उद्यान भायखळा इथून आझाद मैदानावर जाणार आहे. तिथ मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार आहे. या मोर्चात मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी,आदी मागण्यांसाठी मराठा मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील हा ५८ वा मूक मोर्चा आहे.सध्या मुंबईतील रस्ते लोकल ट्रेन मावळ्यांमुळे भगव्या झाल्या आहेत. आजचा हा मराठा मूक मोर्चा निर्णायक ठरणार आहे.