माऊली फुटवेअर शाखा क्र.२ चे उद्घाटन संपन्न
शाहुवाडी : शाहुवाडी तालुक्यातील मलकापूर इथं माऊली फुटवेअर शाखा क्र.२ चे उद्घाटन पेरीड नाका येथील गणपती मंदिरासमोर, वेदांताचार्य ह.भ.प. श्री कृष्णानंद शास्त्रीजी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

या कार्यक्रम सोहळ्यास जिल्हापरिषद कोल्हापूर चे माजी बांधकाम व आरोग्य सभापती व विद्यमान जि.प.सदस्य सर्जेराव पाटील पेरीडकर उपस्थित होते. दरम्यान शाहुवाडी पंचायत समिती च्या सभापती सौ.सुनिता पारळे, त्याचबरोबर कॉंग्रेस च्या शाहुवाडी तालुका महिला अध्यक्षा सौ वैशाली बोरगे यांची उपस्थिती होती. दरम्यान बांबवडे व्यापारी वेल्फेअर असोसिएशन चे अध्यक्ष बाळासाहेब खुटाळे यांच्यासह सर्व संचालक मंडळ व सदस्य उपस्थित होते. बांबवडे-पैजारवाडी ग्रुप, याचबरोबर बांबवडे येथील उद्योगपती तानाजी चौगुले, तसेच उद्योगपती बाळासाहेब चौगुले, बांबवडे ग्रामपंचायत चे विद्यमान सदस्य अभयसिंह चौगुले यांची देखील उपस्थिती होती. मलकापूर नगरपरिषद चे माजी उपनगराध्यक्ष दिलीप पाटील पेरीडकर, बांबवडे ग्रामपंचायत चे माजी सरपंच व विद्यमान सदस्य विष्णू यादव, चंद्रकांत भिंगार्डे आणि परिवार आणि मलकापूर परिसरातील नागरिक उपस्थित होते. दरम्यान प्रशासकीय यंत्रणेतील शाहुवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख उपस्थित होते.

उपस्थितांचे स्वागत विठ्ठल पोवार व नामदेव पोवार बंधूंनी केले. यावेळी शंकरराव ज्ञानदेव पोवार, विष्णू ज्ञानदेव पोवार, सुनील शंकरराव पोवार, व साळशी ग्रामस्थ देखील उपस्थित होते.