माजी खास. श्री शेट्टी यांची शाहुवाडी तालुक्यातील पूरग्रस्त भागांना भेट : नागरिकांतून समाधान

बांबवडे : शाहुवाडी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पुराचे पाणी गावात घुसले,असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

याची पाहणी करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार श्री राजू शेट्टी यांनी अनेक गावांना भेट दिली.
वाडीचरण, थेरगाव आदी गावांना राजू शेट्टी यांनी भेट देवून नागरिकांची विचारपूस केली. वाडीचरण येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले आहे. याची पाहणी सुद्धा त्यांनी केली. दरम्यान पावसामुळे खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे आदेश देखील श्री शेट्टी यांनी वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
दरम्यान श्री राजू शेट्टी यांनी भेट दिल्याने, शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.