माळापुडे येथील महिला बेपत्ता
बांबवडे प्रतिनिधी : माळापुडे तालुका शाहुवाडी येथील सौ छाया सुदाम कांबळे वय २८ वर्षे या महिला किराणा सामान घेवून येते, असे सांगून घरातून निघून गेल्या आहेत. अशा आशयाची तक्रार त्यांचे पती सुदाम सखाराम कांबळे यांनी शाहुवाडी पोलिसात दिली आहे.

सुदाम सखाराम कांबळे वय ३४ वर्षे रहाणार माळापुडे तालुका शाहुवाडी हे स्वत: सेंट्रींग काम करतात. त्यांची पत्नी सौ छाया सुदाम कांबळे वय २८ वर्षे, या शनिवार दिनांक ८ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वाजनेच्या दरम्यान घरातून किराणा सामान घेऊन येते , असे सांगून निघून गेल्या , त्या अद्याप घरी परतल्या नाहीत. त्या घरी न आल्याने नातेवाईक यांच्याकडे देखील चौकशी केली असता, ती कुठेतरी निघून गेली एवढेच समजले.

त्या अद्याप घरी न परतल्याने इतरत्र चौकशी केल्यानंतर सुद्धा काही पत्ता न लागल्याने, सुदाम कांबळे यांनी शाहुवाडी पोलीस ठाण्यात मंगळवार दि.११ ऑक्टोबर २०२२ रोजी तक्रार दाखल केली आहे.

अधिक तापस शाहुवाडी पोलीस ठाणे करीत आहे.