चांदोली येथील वारणा जलविद्युत प्रकल्प सुरु : धरण ८९.२० % भरले
शिराळा/प्रतिनिधी
चांदोली धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या वारणा जलविद्युत प्रकल्पाची दोन विद्युत जनित्र सुरु करून १६०० क्युसेक्सने पाणी वारणा नदीत सोडले जात आहे.
धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने, पाणी साठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आज सकाळी ९वाजून २० मिनिटांनी वारणेची विद्युत निर्मिती सुरु करण्यात आली आहे. वारणा व चांदोली-सोनवडे या दोन्ही वीज निर्मिती केंद्रातुन २० मेगावॅट वीज निर्मिती सुरु झाली आहे . धरणातुन पाणी सोडण्यात आले असले तरी, पावसाचे प्रमाण कमी असल्याने वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर आलेले नाही. २४ तासात ६ मी. मी. पावसाची नोंद झाली असून, एकूण १५८९ मी मी पावसाची नोंद झाली. धरणाची पाणी पातळी ६२३.५० मी.इतकी असून धरण ८९.२० टक्के भरले आहे.