राजकीयसामाजिक

रयत संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी श्री विजय चिखलकर

बांबवडे :थेरगाव तालुका शाहुवाडी येथील श्री विजय विश्वास चिखलकर यांची रयत क्रांती संघटने च्या कोल्हापूर पश्चिम जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तशा आशयाचे पत्र रयत क्रांती संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष श्री सागर खोत यांनी दिले आहे.
विजय चिखलकर एक धडपडी युवा नेतृत्व आहे. अनेक गोरगरिबांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम विजय यांनी केले आहे. तसेच आरोग्य विषयक समस्या असणाऱ्यांना शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून मदत केली आहे.
यावेळी पत्रकारांशी बोलताना श्री विजय चिखलकर म्हणाले कि, मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. आपला तालुका वाड्या वस्त्यांचा तालुका आहे. येथील जनतेला आरोग्यविषयक तसेच इतर कामात सहकार्य करण्यामध्ये आमचा आग्रह राहील. शासन दरबारी सामान्य जनतेचे प्रश्न पोहचवण्याचे काम आम्ही करणार आहोत. यावेळी मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष सुनील पाटील, अनिकेत तेली,पिशवी चे सरपंच विनायक पाटील, वाडीचरण चे उपसरपंच सचिन लाड, विजय पाटील, विकास चिखलकर, जालिंदर रेडेकर, सुरज जंगम , गणेश जंगम, प्रणाम पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!