रणवीर सिंग गायकवाड सरकार यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा
बांबवडे : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, उदय साखर चे संचालक , रणवीरसिंग गायकवाड युवा शक्ती संघटनेचे संस्थापक रणवीर सिंग गायकवाड सरकार यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्यावतीने उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.

स्व. खासदार उदयसिंगराव गायकवाड यांची मुत्सद्देगिरी, मानसिंगराव गायकवाड दादा यांचा निडरपणा आणि त्यांच्याकडे असलेले संघटन कौशल्य या गुणांच्या बळावर त्यांनी निर्माण केलेलं कार्यकर्त्याचं मोहोळ निश्चितच कौतुकास्पद आहे.

मागील जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत परक्या मतदारसंघात जावून सुद्धा त्यांनी आपलं अस्तित्व दाखविण्याचा यशस्वी प्रयत्न केला. कमी वयात सामाजिक प्रश्नांना हातात घेवून आपल्या राजकारणाची यशस्वी सुरुवात त्यांनी केली होती. भागातील पाणीप्रश्न, तहसील कार्यालयातील गोंधळ त्याचबरोबर आपल्या आय-बहिणींसाठी त्यांनी आरोग्यसुविधा निर्माण करून देण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता.

आज त्याच प्रयत्नांच्या बिजारोपानामुळे त्यांना जिल्हा बँकेत संचालक पदावर काम करण्याची संधी मिळाली.

त्यांच्या या गुणांमुळेच आज तरुण वर्गात एक उमदं नेतृत्व म्हणून ते नावारूपाला येवू लागले आहेत. या नव्या तरुण उमेदवाराला सामाजिक जीवनात काम करण्याची संधी मिळावी, अशीच सर्व सामान्य जनतेकडून अपेक्षा केली जात आहे. अशा निगर्वी व्यक्तिमत्वाला पुनश्च त्यांच्या वाढदिवसानिमित लाख लाख शुभेच्छा.