रात्रीच्या वेळेस भरधाव ट्रक ची येळाणे इथं विद्युत खांबाला धडक
मलकापूर प्रतिनिधी (रोहित पास्ते ) शाहुवाडी तालुक्यातील येळाणे गावाच्या निनाई मंदिराजवळील विद्युत खांबाला एका भरधाव ट्रक ने जोराची धडक दिली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार , सिमेंट ने भरलेला ट्रक क्र. एम.एच.१३ सी.यु.१३१७ हा ट्रक मलकापूर दिशेहून कोल्हापूर दिशेला निघाला होता. यावेळी येळाणे गावाच्या निनाई मंदिराजवळ असलेल्या विद्युत खांबाला डावीकडे या ट्रक ने जोरदार धडक दिली. रात्रीची वेळ असल्याने रस्त्यावर रहदारी कमी होती. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ट्रक चालक ट्रक सोडून पाळून गेल्याचे समजते. हि घटना बुधवार दि.१२ ऑक्टोबर रोजी रात्री ९ च्या सुमारास घडली.