रेठरे (वारणा ) इथं संकल्प जनसेवा प्रतिष्ठान च्यावतीने आरोग्य शिबीर संपन्न
रेठरे : शाहुवाडी तालुक्यातील रेठरे ( वारणा ) इथं दि.७ नोव्हेंबर २०२१ रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

संकल्प जनसेवा प्रतिष्ठान च्या वतीने श्री. पी.वाय. वडकर सर यांच्या सेवा निवृत्ती चे औचित्य साधून या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आरोग्य तपासणी करण्यासोबत मोफत औषधोपचार सुद्धा करण्यात आले.

यावेळी सुमारे १२० ग्रामस्थांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. यावेळी रक्त तपासणी,तसेच शुगर तपासणी देखील करण्यात आली. या शिबिरासाठी डॉ.सुभाष पाटील, तसेच डॉ. पूनम पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत श्री. भरतराज भोसले सरकार यांनी केले.
या शिबिरासाठी सर्वश्री सुनील पाटील, अमोल सुतार, विवेक पाटील, उमेश दाष्टे, श्रीकांत दळवी, ग्रामपंचायत रेठरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
यावेळी संकल्प ग्रुप चे सर्व सदस्य रविराज जाधव, गोरख पाटील, सुनील पाटील, सुखदेव सोरटे, दत्तात्रय जाधव, मंगेश सोरटे, व इतर सर्व ग्रुप सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार श्री विक्रम पोतदार यांनी मानले.