केखले येथे वाढदिवसानिमित्त गरजू मुलांना शालेय साहित्याचे वाटप
कोडोली प्रतिनिधी:-
केखले ता.पन्हाळा येथील राजगड फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व मनसेचे विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष सुरज निकम यांच्या वाढ़दिवसानिमित्त दत्तक घेण्यात आलेल्या गरीब व गरजू मुलां-मुलींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
सुरज निकम यांनी वाढदिवस साजरा करण्यासाठी होणारा वायफळ खर्च टाळून केखले गावातीलच गरीब व गरजू मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणासाठी येणार खर्च उचलला आहे.
आज समाजकल्याण सभापती विशांत महापुरे यांच्या हस्ते मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी पतित पावन संघटना तालुका अध्यक्ष सौरभ घाटगे, तालुका उपाध्यक्ष सतिश निकम, उपसरपंच राजाराम पाटील, ग्रा.पं सदस्य सुरेश निकम, पांडुरंग पाटील, बाबा माने, राहुल गीरवे, विजय परीट, विजय पाटील , अजित पाटील, जयवंत निकम, तसेच राजगड फौंडेशनचे व पतित पावन संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.