श्री संत नामदेव महाराज शिंपी समाज च्या वतीने मलकापूर इथं मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
मलकापूर प्रतिनिधी : श्री संत नामदेव महाराज शिंपी समाज मलकापूर व शासकीय रुग्णालय मलकापूर इथं सर्व रोग निदान आरोग्य शिबीर संपन्न झाले.

या शिबिरामध्ये रक्त, लघवी, तपासणी, व आरोग्याची मोफत तपासणी करण्यात आली. मलकापूर शहरातील तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घेतला. सुमारे १४० लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला.

श्री संत नामदेव शिंपी समाज भवन, भाजी मंडई शेजारी मलकापूर या ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शासकीय रुग्णालयाचे डॉ. सुहास कुलकर्णी, डॉ. क्षितिजा धावडे, कर्मचारी वैभव जगताप, जयश्री गुरुळे, शालिनी खोंदल, प्रथमेश मगदूम, डॉ.स्मिता कांबळे, डॉ. पूजा पांडव, उपस्थित होते.

यावेळी शिंपी समाजाचे अध्यक्ष योगेश खटावकर, अमर खटावकर, नगरसेवक सुभाष कोळेकर, अनिकेत हिरवे, प्रकाश मिरजकर, प्रशांत खटावकर, पत्रकार संतोष कुंभार, संजय जगताप तसेच राजाई महिला मंडळ, व समाज बांधव उपस्थित होते.