श्री संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवनी समाधी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न
मलकापूर प्रतिनिधी : शाहुवाडी तालुक्यातील मलकापूर शहरामध्ये श्री संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवनी समाधी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

यावेळी श्री संत शिरोमणी नामदेव महाराज मंदिरामध्ये मंगळवार दि.२६ जुलै रोजी सकाळी ७.३० वाजता नामदेव महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला. त्यानंतर मूर्ती व ग्रंथ यांची पालखी तून दिंडी काढण्यात आली. दुपारी १.०० वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला.

तसेच समाजातील गुणवंत विद्यार्थी यांचा बक्षीस वितरण, व सत्कार समारंभ हा ३० जुलै रोजी संपन्न होणार आहे. दिंडीमध्ये वयस्कर मंडळी, महिला, तसेच लहान मुले सहभागी झाले होते. मंदिरातील पूजा, अभिषेक, मंत्रोच्चार निर्मालानंद स्वामी यांनी केला. दिंडीत कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक व उदय सह. साखर कारखान्याचे संचालक रणवीरसिंग गायकवाड यांची देखील उपस्थिती होतील.दिंडी प्रदक्षिणा मार्गावर घरोघरी पाद्यपूजन करण्यात आले.

यानंतर विठ्ठल मंदिर परिसरात रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन हे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज शिंपी समाज व राजाई महिला मंडळ मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

यावेळी शिंपी समाज अध्यक्ष योगेश खटावकर, उपाध्यक्ष अनिकेत हिरवे, खजानीस प्रकाश मिरजकर, सेक्रेटरी अमर खटावकर, पुरुषोत्तम ओतारी, रवींद्र खुर्द, प्रशांत खटावकर, दस्तगीर आत्तार, नगरसेवक सुभाष कोळेकर, चंद्रकांत पास्ते, मंगेश खटावकर, तसेच राजाई महिला मंडळ अध्यक्षा शोभा हिरवे, उपाध्यक्षा अनुराधा हिरवे, खजानीस अरुणा तांदळे, सेक्रेटरी संजीवनी आणेकर, उप सेक्रेटरी गीतांजली कोळेकर, माजी नगराध्यक्षा शोभा मिरजकर, उप नगराध्यक्षा अनुराधा हिरवे, तसेच सर्व समाज बांधव , भजनी मंडळ, वारकरी सांप्रदाय उपस्थित होते.