सागर कांबळे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व दीर्घायुषी होवो
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील सरपंच व आदर्श मित्र मंडळाचे आधारस्तंभ सागर कांबळे यांना सा. शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
सागर कांबळे एक मितभाषी पण अतिशय हुशार व्यक्तिमत्व. चौफेर फटकेबाजी करणारं, हे व्यक्तिमत्व कलेच्या शिखरावर देखील राज्य करणारं व्यक्तिमत्व आहे. एकेकाळी कलेत रमणारे सागर, आकडेमोडीत देखील आघाडीवर सिद्ध झाले. म्हणूनच त्यांना बांबवडे नागरी पतसंस्थेच्या सरूड शाखेच्या व्यवस्थापक पदी त्यांची वर्णी कधी लागली हे कळलेच नाही. त्यानंतर ते राजकारणातही यशस्वी ठरले. बांबवडे सारख्या बाजारपेठ असलेल्या गावाचे ते सरपंच झाले, तो दिवस आदर्श मित्र मंडळासाठी मानाचा ठरला. असे हे व्यक्तिमत्व दिवसेंदिवस दीर्घायुषी होवो, त्यांना पुनश्च त्यांच्या वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा…