सीताई समूहाचे आनंदराव कांबळे यांच्याकडून मुकुंद पवार यांचा बुके देवून सत्कार संपन्न
बांबवडे : शाहुवाडी तालुका भीमशक्ती संघटनेचे नेते तसेच सीताई उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आनंदराव कांबळे यांनी जेष्ठ पत्रकार श्री मुकुंद पवार यांचा त्यांच्या निवासस्थानी जावून, त्यांचा शाल , बुके देवून, सन्मान केला. त्यांच्या सोबत बबनराव कांबळे हे देखील उपस्थित होते. मुकुंद पवार यांना कोल्हापूर जिल्हा परिषद च्यावतीने आचार्य अत्रे उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्कार मिळाला. या अनुषंगाने हा सन्मान करण्यात आला.

यावेळी आनंदराव कांबळे म्हणाले कि, मुकुंद पवार हे गेली २५ वर्षे पत्रकारितेमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील अनेक प्रश्नांना वाचा फोडली आहे. त्यामुळे त्यांना मिळालेला पुरस्कार योग्यच आहे. याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा.