राजकीयसामाजिक

सेना तळागाळातील लोकांपर्यंत पोहचली पाहिजे : आनंदराव भेडसे


बांबवडे : शिवसेना तळागाळातील लोकांपर्यंत पोहचायला पाहिजे. सर्वसामान्यांना शिवसेनेच्या माध्यमातून अनेक कामात सहकार्य झालं पाहिजे, यासाठी च गाव तिथं शिवसेना शाखा निर्माण होणं, हि काळाची गरज आहे, असे शाहुवाडी व पन्हाळा तालुका शिवसेना संपर्कप्रमुख आनंदराव भेडसे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Advt.


शिवसेनेच्या वतीने गाव तिथं शिवसेना शाखा स्थापन करण्याच्या अनुषंगाने सभासद वाढविण्यासाठी आवेदन फॉर्म भरण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर तरुण व तरुणी उपस्थित होते. अनेकांनी यावेळी आवेदन पत्र भरून शिवसैनिक होण्याचा मान मिळवला.

Advt.


यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी, सचिन मूडशिंगकर, विजय लाटकर, दिनकर लोहार, अलका भालेकर व शिवसैनिक उपस्थित होते.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!