गुन्हे विश्व

सावे इथं तीन वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार : आरोपी ताब्यात


बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील सावे इथं एका नराधमाने तीन वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केला असून, बालिकेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Advt.


सावे इथं दारात खेळत असलेल्या तीन वर्षाच्या बालिकेला घरात बोलवून येथील नराधम यशवंत बापू नलवडे ( वय ५५ वर्षे )याने लैंगिक अत्याचार केले आहे. सदर च्या घटनेमुळे सावे गाव सुन्न झाले आहे. तर प्रत्येकाच्या मनात संताप खदखदत आहे. या घटनेनंतर शाहुवाडी पोलीस ठाण्यावर गावातील महिला गेल्या होत्या. महिलांच्या डोक्यात या घटनेचा राग खदखदत आहे.

Advt.


शाहू महाराजांच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या शाहुवाडी तालुक्यातील हि घटना निश्चितच लाजिरवाणी आहे. ज्या भूमीत छत्रपतींचे चरण कमल वास्तव्य करीत होते. आज त्याच भूमीत लैंगिक अत्याचार घडावे, तेही तीन वर्षांच्या बालिकेवर . हि घटना मनाला न पटण्यासारखी आहे. यामुळे परीसारात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Advt.


यावेळी घटनास्थळी कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, पोलीस उपाधीक्षक प्रशांत अमृतकर, यांनी भेट दिली व त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाहुवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण चौगुले, सहा.पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख, पोलीस उपनिरीक्षक प्रियांका सराटे व पोलीस वृंद अधिक तपास करीत आहे.करीत आहेत.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!