मलकापुरात भाजी मंडई त दोन अर्भके सापडली : माहिती देण्याबाबत पोलीस निरीक्षक रानमळे यांचे नागरिकांना आवाहन
मलकापूर : मलकापूर तालुका शाहुवाडी येथे भाजी मार्केट परिसरात एक पुरूष व एक स्त्री जातीचे अशी दोन अर्भक सापडली आहेत. या बाबत अज्ञात व्यक्तीच्या विरोधात शाहुवाडी पोलीसात गुन्हा नोंद झाला असल्याची माहिती, पोलीस निरिक्षक मनोहर रानमाळे यांनी दिली.
पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार, मलकापूर येथील भाजी मंडई नजीक एक चार महिने वयाचे स्त्री जातीचे, तर सहा महिने वयाचे पुरूष जातीचे अर्भक सफाई कामगाराच्या निदर्शनास आले. सदर घटनेची माहिती त्यांनी शाहुवाडी पोलीसांना दिली .
घटना स्थळी सापडलेली दोन्ही अर्भके ग्रामीण रूग्णालय मलकापूर येथे दाखल करून, त्यांची डी. एन. ए. चाचणी करण्यात आली. मलकापूर शहरात या घटनेने सर्वत्रच खळबळ उडाली असून, सर्वच ठिकाणी दबक्या आवाजात या घटनेची चर्चा सुरू आहे .
या घटनेच्या मुळापर्यंत जाऊन त्याचा शोध लावला जाणार असून, या घटने बाबत नागरीकांना शाहुवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने आवाहन करण्यात येते की, या बाबत अधिक माहिती मिळाल्यास शाहुवाडी पोलीस ठाण्यास संपर्क साधावा .असे आवाहन पोलीस निरीक्षक मनोहर रानमळे यांनी केले आहे .दरम्यान या घटने बाबत पोलीस उपअधिक्षक आर. आर. पाटील यांनी भेट देवून तपासाच्या सुचना दिल्या.
या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक श्रीराम पडवळ हे करत आहेत.