चोरीप्रकरणी तिघांना अटक : रोख रक्कम व मुद्देमाल ताब्यात
शिराळा : शिराळा व नाटोली येथील चोरी प्रकरणी संशयित आरोपी म्हणून सुभाष उर्फ पिंटू आण्णाप्पा गोसावी ( २७ वर्षे ), विकास प्रकाश गोसावी (वय २१ वर्षे ) दोघे रहाणार बागणी तालुका वाळवा , व विकास उर्फ विकी प्रकाश गोसावी रहाणार मांगले तालुका शिराळा यांना शिराळा पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी कि, शिराळा येथील प्राध्यापक कॉलनी येथील बाळकृष्ण गंगाराम पाटील यांच्या घरातून रोख रक्कम व सोने असा ७३ हजाराचा ऐवज गेला होता. तसेच नाटोली येथील महादेव मारुती पाटील यांच्या घरातून सोने व रक्कम असा मिळून एकूण ७३ हजाराचा ऐवज गेला होता. यातील संशयित आरोपी विकास गोसावी यास मांगले तर सुभाष व विकास प्रकाश गोसावी यांना कळे तालुका पन्हाळा इथून ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी शिराळा चोरीतील रोख दोन हजार व नाटोली येथील ५६ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेण्यात आला आहे.