Uncategorized

HSRP नंबर प्लेट्स साठी अधिकृत सेंटर : गुरुनाथ ऑटोमोबाईल

बांबवडे : गुरुनाथ ऑटोमोबाईल बांबवडे तालुका शाहुवाडी इथं आपल्याला गरजेच्या असलेल्या HSRP नंबर प्लेट्स म्हणजेच उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसवून मिळतील. हि पाटी बसविण्याची अंतिम मुदतवाढ दि.१५ ऑगस्ट २०२५ पर्यंत आहे. यासाठी आजच आपली नोंदणी करा. असे आवाहन : गुरुनाथ ऑटोमोबाईल चे मालक श्री श्रीकांत सिंघण यांनी केले आहे.
ROSMERTA SAFETY SYSTEM LTD या कंपनीचे शाहुवाडी तालुक्यासाठी अधिकृत फिटनेस सेंटर आहे. शासकीय नियमानुसार १ एप्रिल २०१९ पूर्वी ज्या वाहनांची नोंदणी आहे, त्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी पाटी (HSRP ) असणे अनिवार्य आहे. अशी पाटी नसलेल्या वाहनांवर कायदेशीर कारवाई प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने करण्यात येणार आहे. १ एप्रिल २०१९ या पूर्वी नोंदणी असलेल्या दुचाकी आणि चार चाकी वाहनाच्या नंबर प्लेट्स या HSRP असणे, कायद्याने गरजेचे आहे. अन्यथा आपल्या वाहनाला दंड होणार आहे. या नंबर प्लेट्स बसविण्याची मुदत फक्त १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत आहे. त्यानंतर आपल्या वाहनाला हि HSRP नंबर प्लेट नसल्यास आपल्याला शासकीय कारवाई स सामोरे जावे लागणार आहे.
यासाठी आपल्या दुचाकी, तसेच चार चाकी वाहनाच्या HSRP नंबर प्लेट्स फिटिंग साठी बांबवडे इथे नोंदणी सुरु आहे. यासाठी आपल्याला आपल्या वाहनांचे RC BOOK SMART CARD घेवून गुरुनाथ ऑटोमोबाईल मध्ये नोंदणी करता येईल.. यासाठी आपणास गुरुनाथ ऑटोमोबाईल चे मालक श्री श्रीकांत सिंघण यांच्याशी संपर्क साधा.संपर्क क्र.8109812929, 9423282915 असे आवाहन श्री सिंघण यांनी केले आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!