कांदे इथं अल्पवयीन मुलीवर बलात्कार : एकास अटक
शिराळा (प्रतिनिधी ) :
कांदे तालुका शिराळा येथील प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अंधाराचा व नातेसंबंधाचा गैरफायदा घेवून थेरगाव तालुका शाहुवाडी येथील अक्षय घोलप याने बलात्कार केला असल्याची फिर्याद पिडीत मुलीच्या आईने शिराळा पोलीस ठाण्यात केली आहे.याप्रकरणी अक्षय महादेव घोलप यास थेरगाव इथून पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी कि, दि.१५ एप्रिल रोजी रात्री १० वाजण्याच्या दरम्यान मिरवणूक पाहण्यास गेलेली मुलगी मिरवणूक संपली तरी घरी न आल्याने तिच्या आईने शोधा-शोध सुरु केली. याबाबत महिलेने आपल्या पतीस माहिती दिली. दरम्यान रात्री ११ वाजनेच्या सुमारास मुलगी रडत रडत घरी आली. मुलीच्या आईने मुलीकडे चौकशी केली असता, मुलीने सांगितले कि, मिरवणूक पाहून ,ओवाळणी चा कार्यक्रम सुरु झाल्याची माहिती देण्यास घरी येत असताना, थेरगाव तालुका शाहुवाडी येथील आमच्याच नात्यातील अक्षय महादेव घोलप व त्याच्या आत्याचा मुलगा मोटरसायकलवरून आले. मोटरसायकल अक्षय चालवत होता. दरम्यान त्याच्या मागे बसलेल्या मुलाने मुलीच्या तोंडाला रुमाल लावला, व्तीला गाडीवर बसवले. गाडीवरून तिला कांदे-सावर्डे पुलाजवळ नेले. तिथे अक्षय ने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला.त्यानंतर मुलीला कुसुम शिवजातक यांच्या घराजवळ सोडून दोघांनी पोबारा केला. दरम्यान आज कांदे इथं उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली शिंदे यांनी घटनास्थळाला भेट दिली.
अधिक तपास पोलीस उपविभागीय अधिकारी वैशाली शिंदे करीत आहेत.