काखे येथे दोन गटात मारामारी,९ जण जखमी : दोघांची प्रकृती गंभीर
कोडोली प्रतिनिधी:-
काखे ता.पन्हाळा येथे काल दिनांक ६ सप्टेंबर रोजी रात्री साडे अकरा वाजता दोन गटात झालेल्या हाणामारीत ९ जण जखमी झाले आहेत. तसेच २६ जणांवर कोडोली पोलीस ठाण्यात मारामारी बाबत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जखमी पैकी दोघा जणांची प्रकृती गंभीर आहे.
काखे येथे काल दिनांक ६ सप्टेंबर रोजी झालेल्या दोन गटातील भांडणात 9 जण जखमी झाले आहेत. दोन्ही गटाच्या परस्पर फिर्यादीनुसार काखे येथील चांदोली वसाहती मध्ये रहात असलेल्या सुनील वकटे आणि सुनील जाधव यांच्यात जुना वाद आहे. वारंवार या दोनही गटामध्ये वाद होत असतो. जुन्या वादाचे कारण काढून बुधवार दिनांक ६ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजता या दोघांच्यात आणि पर्यायानं दोन्ही गटात पुन्हा वाद झाला. मागच्या भांडणाचा वाचपा काढण्यावरून या दोन्ही गटात पुन्हा वाद झाला. या मध्ये , लक्ष्मण वकटे, पार्वती वकटे, सुनील जाधव, रामचंद्र जाधव, शामराव जाधव, सुनील वकटे, सुरेश पाटील, संदीप पाटील, आणि आयेशा महालदार आदी ९ जण जखमी झालेत. त्या पैकी दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर कोल्हापूर येथील, छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात उपचार सुरु आहे. या बाबत दोन्ही पक्षाकडून परस्पर विरोधी २६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या बाबत कोडोली पोलीस अधिक तपास करत आहेत.