भाडळे खिंडीजवळ तरुणाचा गळफास
शाहुवाडी तालुक्याच्या सुरुवातीलाच भाडळे खिंडीजवळ असलेल्या शेतात, एका अज्ञात तरुणाचा झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह आढळला आहे.
त्या तरुणाची ओळख पटलेली नाही. मृतदेह अंदाजे २० ते २२ वर्षे वय असलेल्या तरुणाचा असल्याचे समजते. मृतदेहाजवळ टोपी ,सॅक व चप्पल आढळली आहे.