भविष्यातील प्रशासकीय अधिकरी निर्माण होतील- आनंदराव माईंगडे
बांबवडे :इथं येणारा विद्यार्थी भविष्यातील चांगला प्रशासकीय अधिकारी व्हावा, यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे वेळोवेळी आयोजन करण्यात येत आहे, तसेच येथून चांगला खेळाडू सुद्धा निर्माण व्हावा, यासाठी सुद्धा प्रयत्न असणार आहेत. असे मत संस्थेचे संस्थापक श्री आनंदराव माईंगडे यांनी व्यक्त केले.
दत्तसेवा निवासी विद्यालय तुरुकवाडी,इथं स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर नुकतेच संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक श्री आनंदराव माईंगडे होते.
दत्तसेवा निवासी विद्यालय तुरुकवाडी, इथं विद्यार्थ्यांची सगळ्या बाजूंकडून तयारी करून घेण्याचा यशस्वी प्रयत्न केला जातो. इथं विद्यार्थ्यांना अभासाबरोबर खेळ, व्यायाम, योगासन ,त्याचबरोबर मान्यवरांच्या व्याख्यानमालेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची माहिती दिली जाते. भविष्यात हेच विद्यार्थी भावी प्रशासकीय अधिकारी व्हावेत. असे विद्यालय संचालक मंडळाचा मानस आहे.
आयुष्यात प्रत्येकाने भूतकाळ कितीही वाईट असला, तरी तो विसरून प्रत्येकाने नव्या दिशांचे वेध घेण्यासाठी माहिती मिळवून आपली तयारी करायला हवी.आणि या तयारी च्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे. असे मत प्रतिपादन श्री अजितकुमार पाटील यांनी केले.
श्री पाटील पुढे म्हणले कि,आपल्या प्रत्येकाकडे क्षमता असते, फक्त आपण योग्य मार्गाने, नियोजनाने अभ्यास केला कि, यश आपल्या पदरात पडल्याशिवाय रहात नाही.
यावेळी श्री सागर मर्गज यांनी १०वी,१२वी नंतर असणाऱ्या सर्व कोर्सेस ची माहिती उपस्थितांना दिली. तसेच स्पर्धा परीक्षा तयारी विषयी सुद्धा त्यांनी सर्वंकष माहिती दिली.
यावेळी कोतोली येथील मुळ रहिवाशी असलेल्या ,व स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरघोस यश मिळवत, पोलीस खात्यात प्रवेश केला,अशा पोलीस निरीक्षक लता सुतार यांनी आपण केलेल्या परिश्रमाची आणि मिळवलेल्या यशाची माहिती उपस्थितांना दिली.
यावेळी प्राचार्य पोतदार सर,शिक्षकवृंद तसेच ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.