मांगरूळ सरपंचांसह इतर सात जणांच्या अपत्रातेला स्थगिती
शिराळा ( प्रतिनिधी ) : मांगरूळ तालुका शिराळा येथील गायरान अतिक्रमण प्रकरणाबाबत विभागीय आयुक्त पुणे यांनी सरपंचांसह सात जणांना अपात्रतेचे आदेश दिले होते. दरम्यान या निर्णयाला ग्रामविकास मंत्र्यांच्या न्यायालयाने स्थगीती दिली आहे.
सविस्तर हकीकत अशी कि, मांगरूळ येथील गायरान सर्व्हे. क्र. ३१९/अ/१ मध्ये खासगीरीत्या अतिक्रमण करण्यात आले होते. या प्रकरणी सरपंच मनीषा कुंभार, उपसरपंच संग्रामसिंह पाटील, यांच्यासह सात जणांना अधिकार व सदस्य पदावरून काढून टाकण्याचे आदेश पुण्याचे विभागीय आयुक्त एस.चोकलींगम यांनी दिले होते. या आदेशाला ग्रामविकासमंत्र्यांच्या न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
विभागीय आयुक्त पुणे यांनी दिलेल्या आदेशाविरुद्ध उपसरपंच संग्रामसिंह पाटील ,भीमराव तांबीरे ,सुषमा खांडेकर , शोभाताई शेणवी ,कमल म्हस्के , यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ३९ (३ ) नुसार ग्रामविकास मंत्री यांच्या न्यायालयात अपील दाखल केले आहे. त्यामुळे पुढील सुनावणी पर्यंत आयुक्त पुणे यांच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे.