मुंबई-गोवा महामार्गावर अपघात : तीन ठार
रत्नागिरी : मंबई-गोवा महामार्गावर बसला झालेल्या भीषण अपघातात तीन जणांना आपले प्राण गमवावे लागले. या अपघातातील २१ जणांची प्रकृती गंभीर आहे.
मुंबई -गोवा महामार्गावरील सावर्डे येथील आगवे वळणावर विशाल ट्रॅव्ह्ल्स ची बस पलटी झाली.बस मधील सर्व प्रवासी मालवण ला जायला निघाले होते. आगवे वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला.आणि अपघात घडला.
सावर्डे पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने जखमींना जवळच्या डेरवण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.