१९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी ‘मुस्तफा डोसा ‘ याचा मृत्यू
मुंबई : मुंबईतील १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी मुस्तफा डोसा याचा मृत्यू झाला आहे. काल रात्री छातीत दुखत असल्याने त्याला जे.जे.रुग्णालयात दाखल केले होते,तिथे त्याच्यावर उपचार करून पुन्हा त्याला आर्थररोड जेल मध्ये नेण्यात आले. आज सकाळी त्याचा मृत्यू झाल्याचे समजत आहे.
अनियंत्रित अतितणाव आणि छातीतील संसर्गामुळे डोसाला हा त्रास होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.पण आज त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. दोन अबू सालेम, मुस्तफा डोसा, फिरोज खान, ताहीर मर्चंट, रियाज सिद्दिकी आणि कारीमुल्लाह शेख यांना कोर्टानं दोषी ठरवल आहे.