पुण्याचा रोहन राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित
मुंबई : मेजर ध्यानचंद यांच्या २९ ऑगस्ट या जन्मदिनी अनेक खेळाडूंना ‘ राष्ट्रीय खेळ दिवस ‘ म्हणून सन्मानित करण्यात येते. यंदा पुण्याच्या रोहन मोरे ला साहसी खेळासाठी राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. हा सोहळा राष्ट्रपती भवन इथ संपन्न झाला. साहसी क्षेत्रासाठी दिला जाणारा तेनजिंग नोर्गे पुरस्कार पुण्याचा स्विमर रोहन मोरेला मिळाला.
रोहन ने आजपर्यंत अनेक समुद्री खाड्या पार केल्या आहेत. जपान ची त्सगारू चॅनेल ची तब्बल ३२ किलोमीटर ची खाडी रोहन ने १० तास ३७ मिनिटात पार करण्याचा पराक्रम केला. असे अनेक पराक्रम रोहन ने आजपर्यंत केले आहेत. म्हणूनच रोहनला राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.