पेरीड च्या मैदानात नेत्रदीपक कुस्त्या
मलकापूर ( प्रतिनिधी ) : पेरीड ता. शाहुवाडी येथे गोरक्षनाथ यात्रे निमित्त आयोजित केलेल्या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाची लढत डबल कर्नाटक केशरी पैलवान कार्तिक काटे आणि ऑलइंडीया युनिवर्सिटी चॅम्पीयन भगवंत केसरी संतोष दोरवड यांच्यातील अर्ध्या तासाच्या लढती नंतर बरोबरीत सोडवण्यात आली. तर स्थानिक बिजली मल्ल राहुल धोत्रे याने नेत्रदिपक कुस्ती करून विजय साकारला.
प्रारंभी आखाड्याचे पुजन शंकर चांदू पाटील, माजी पंचायत समिती सदस्य बापू पाटील यांच्या हस्ते आणि पोलीस निरीक्षक बाजीराव पाटील, बांधकाम आणि आरोग्य समिती सभापती,केडीसी संचालक सर्जेराव पाटील यांच्यासह यात्रा कमिटीच्या मान्यवर प्रमुखांच्या उपस्थितीत करण्यात आले.
मैदानात प्रथम क्रमांकाची लढत संतोष दोरवड आणि कार्तिक काटे यांच्यात लावली. सुरुवातीपासूनच दोघांनी ही डाव प्रतिडाव टाकले. संदीप दोरवडने कुस्ती निकाली करण्याचा केलेला प्रयत्न कार्तिक काटे न धुडकावून लढत दिली. अखेर शेवटी कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली. या कुस्तीला पंच म्हणून पोलीस निरीक्षक बाजीराव पाटील, प्रकाश पाटील, विजय चिंगळे यांनी काम पाहिले.
दोन नंबरच्या लढतीत शाहुपूरी तालीम कोल्हापूरच्या हसन पटेल ने, काका पवार तालीम पुणेच्या पोपट घोडकेवर समोरून हापकी डाव टाकून विजय मिळविला, तर कापशीचा पैलवान शिवाजी पाटील यांने अनिल फाटके शाहुपूरी कोल्हापूर याच्या वर बाहेरील टांग मारून विजय मिळविला. या दोन्ही कुस्तीसाठी पंच म्हणून सर्जेराव पाटील, रंगा पाटील, रामचंद्र सांळुखे ,रावण बजागे यांनी काम पाहिले.
पेरीड चा पैलवान राहुल धोत्रे याने पाच मिनीटात घुटना डावावर स्वप्नील पाटील यांच्यावर विजय मिळविला तर, अजित पाटील सावे याने अभिजित भोसले शित्तूर यांच्यावर विजय मिळविला.
या प्रमुख लढती बरोबरच रणजित पाटील, संभाजी पाटील, कर्तार कांबळे, प्रथमेश पाटील, जयसुर्या सांगावकर, सागर यादव ,नितीन पाटील,ओम भोपळे, सुहास केसरे, सुरज केसरे पेरीड, महेश पाटील, अजय जाधव, विकास मोरबाळे निनाई परळे, प्रताप माने अविनाश पाटील, सुशांत आरंडे, रोहित पाटील कोपार्डे, विकास पाटील मागंरूळ, विश्वास कारंडे कापशी या मल्लासह अन्य पैलवानांनी ही चटकदार कुस्ती करून शौकीनांची वाहवा मिळवली.
या मैदानात पंच म्हणून निवृत्ती पाटील, दत्ता राणे ,आनंदा पाटील, मारुती बोटांगळे, रंगराव पाटील, धर्मराज कांबळे, सुरेश पाटील, भगवान कुंभार, मारुती गाडे, यशवंत गाडे, ज्ञानू पाटील, जयवंत कांबळे, मारूती जाधव , सर्जेराव जाधव, आनंदा यादव यांच्यासह बंडा पाटील रेठरेकर, संपत जाधव, संतोष भिंगले, तुकाराम कदम यांनी काम पाहिले.
या वेळी पाणिपतकार विश्वास पाटील, तहसिलदार चंद्रशेखर सानप, माजी आमदार राऊ धोंडी पाटील , माजी सभापती सुभाषराव इनामदार, पंडीत नलवडे, पंचायत समिती सदस्य विजय खोत, अमर,खोत, नगराध्यक्ष अमोल केसरकर, माजी सभापती हणमंतराव पाटील , उपनगराध्यक्ष दिलीप पाटील, माजी नगराध्यक्ष शामराव कारंडे, रंगराव खोपडे ,बाबुराव सांगावकर, राजु प्रभावळकर, बबन पाटील, दाजी चौगुले, अजय लोध ,सुरेश पाटील, डी. आर. जाधव यांच्या सह मान्यवरांची उपस्थिती होती.
मैदान यशस्वी करण्यासाठी यात्रा कमिटीचे सर्व मान्यवर, ग्रामस्थ, युवक यांनी विशेष परिश्रम घेतले.
दरम्यान यात्रा कमिटीच्या वतीने या वेळी रावण बजागे यांना करा हजार रूपये देऊन जुन्या काळातील उत्कृष्ट मल्ल आणि वस्ताद म्हणून बाजीराव पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. तर तालुक्यातील उत्कृष्ट मल्ल म्हणून शिवाजी पाटील कापशी याला गौरवण्यात आले .मैदानाचे समालोचन ईश्वर पाटील यांनी केले.