जुलै मध्ये विधान भवनावर सेनेचा मोर्चा
नाशिक ( प्रतिनिधी) : शिवसेना जुलै मध्ये फडणवीस सरकारविरोधात मोर्चा काढणार असल्याचे, शिवसेनेच्या वतीने खास. संजय राउत यांनी पत्रकारांशी बोलताना संगोतले.
नाशिक मध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली.यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीबाबत काहीच निर्णय घेत नसल्याने, शिवसेनेच्या वतीने हे पाऊल उचलण्यात आले आहे. येत्या पावसाळी अधिवेशन दरम्यान हा मोर्चा काढण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळाल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही. सरकारने कर्जमुक्ती द्यावी म्हणून, जुलै महिन्यात विधीमंडळावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. केवळ सरकार स्थिर रहावं म्हणूनच सरकारला पाठींबा देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.